Maharashtra government announces new land measurement policy  saam tv
महाराष्ट्र

Land Measurement : आता जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत, अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

Maharashtra Announces ₹200 Land Measurement Scheme : वडिलोपार्जित पोटहिस्सा जमिनीची मोजणी आता फक्त २०० रुपयांत आणि ९० दिवसांत पूर्ण होणार आहे. अर्जासाठी कुटुंबातील सर्वांची संमती, सातबारा उतारा आणि एक कुटुंब प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Namdeo Kumbhar

  • पोटहिस्सा मोजणीसाठी आता फक्त २०० रुपयात होणार आहे. त्यासाठी ९० दिवस लागतील.

  • याआधी या प्रक्रियेसाठी १,००० ते १४,००० रुपये मोजावे लागत होते.

  • अर्ज तालुक्याच्या भू-अभिलेख कार्यालयात करावा लागणार आहे.

  • अर्जासोबत सातबारा उतारा आणि एक कुटुंब प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

land measurement Maharashtra, 200 rupees : एकाच कुटुंबातील पोटहिश्श्याची मोजणी आता फक्त ९० दिवसांत होणार आहे. त्यासाठी अवघे २०० रुपयेच लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांची संमती बंधनकारक असेल. यापूर्वी वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी १ हजार रुपये ते १४ हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत होता. मात्र आता पोटहिस्सा मोजणीसाठी केवळ २०० रुपये खर्च येणार असून हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. पण यासाठी अर्ज कुठे करावा लागणार? कसा अर्ज कराल? कागदपत्रे कोणती लागणार? याबाबत जाणून घेऊयात..

मोजणीसाठी कुठे कराल अर्ज ? How to apply for ₹200 land measurement in Maharashtra

जमिनीचा बांध आणि जागेच्या हद्दीतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी वर्षाला ५०० ते ६०० गुन्हे दाखल होतात. हे वाद कायमचे मिटवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने जमिनीच्या मोजणीसाठी फक्त दोनच प्रकार ठेवले आहेत. ३० ते ९० दिवसांत अर्जदारांची जमीन मोजून दिली जाते. त्यापैकीच पोटहिश्श्याच्या जमिनीची मोजणीचाही निर्णय घेतलाय. ही मोजणी फक्त २०० रूपयात होणार आहे. त्यासाठी तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील जमिनीच्या नियमित मोजणीसाठी हेक्टरी २००० रुपये मोजावे लागतात. तर शहरी हद्दीतील तेवढ्याच जमिनीच्या मोजणीसाठी १००० रुपये जादा द्यावे लागतात.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागणार ? Pot Hissa land measurement application documents list

पोटहिश्श्याच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील उताऱ्यावरील सर्वांची संमती बंधनकारक आहे. त्याशिवाय मोजणीसाठी केलेल्या अर्जासोबत सातबारा उतारा आणि तहसील कार्यालयातील एक कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे, वडिलोपार्जित शेतजमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केल्यास द्रुतगती मोजणीसाठी आग्रह धरता येणार नाही. ही मोजणी ९० दिवसांत पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT