Hasan Mushrif’s political move: Shiv Sena leader Arun Dongale joins NCP ahead of Gokul elections. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी डाव पलटला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

Political Wrestling in Kolhapur: कोल्हापुरातील महत्त्वाच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना नेते अरुण डोंगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने हसन मुश्रीफ यांची राजकीय रणनीती यशस्वी झाली. त्यामुळे स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळालीय.

Bharat Jadhav

  • हसन मुश्रीफ यांनी राजकीय डाव टाकून शिवसेनेच्या अरुण डोंगळे यांना राष्ट्रवादीत आणलं.

  • अरुण डोंगळे हे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि संचालक आहेत.

  • या हालचालीमुळे कोल्हापूरमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार आहे.

कोल्हापूर कुस्तीसाठी जितकं ओळखलं जातं, तितकेच ते राजकारणासाठी ओळखलं जातं. कुस्तीमधील डावाप्रमाणे राजकीय नेते एकमेकांवर कुरघोडी करत समोरील पक्षाला चीतपट करत असतात. असाच एक कुस्तीचा एकेरी पटाप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी राजकारणात डाव टाकला. त्या डावात शिवसेना चीतपट झालीय. डावातून शिवसेनेच्या जवळ गेलेल्या गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळेंना राष्ट्रवादीत आणण्यात ते यशस्वी झालेत.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूरमधील महत्त्वाची असलेली गोकूळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी होणार आहे.

त्याआधीच पक्षांकडून डावपेच आखणं सुरू झालंय. त्याचे उदाहरण हसन मुश्रीफ यांच्या एका राजकीय खेळीचे आहे. कधी शिवसेनेच्या स्टेजवर तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर दिसणाऱ्या गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळे यांना आपल्या पक्षात ओढून आलंय.

पुढच्या वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरतील. अशातच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीतील नेतृत्व देण्यात आलंय. त्यामुळे गोकुळ दूध संघात देखील मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद वाढलीय. अरुण डोंगळे हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिक जवळ गेले होते. डोंगळे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होत होती.

पण हसन मुश्रफांच्या खेळीनं त्यांनी अखेर मंगळवारी(ता.23) राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला.विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराच्या माध्यमातून डोंगरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. हळूहळू शिवसेनेतील संपर्क वाढत गेला. सातत्याने संपर्क वाढल्याने डोंगळे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT