Ajit pawar And Eknath shinde PTI
महाराष्ट्र

महायुतीत फोडाफोडी सुरूच! एकनाथ शिंदेंकडून अजित पवारांना धक्का, बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Mahayuti Politics: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना धक्का दिला. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. महायुतीत फोडाफोडी बंद असताना देखील हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

Priya More

Summary:

  • नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे

  • शिवसेना शिंदे गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिला

  • राष्ट्रवादीचे नेते विशाल परदेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला

  • महायुतीत फोडाफोडी बंद असताना देखील हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

अजय सोनवणे, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीदरम्यान बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरूच आहे. अशातच नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आणि आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

नाशिकच्या येवल्यातील छगन भुजबळांचे समर्थक आणि राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे येवल्यात राष्ट्रवादीला खिंडार पडल्याची चर्चा होत आहे. आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नातून विशाल परदेशी यांनी नागपूर येथे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

विशाल परदेशी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्यावर येवला शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे या पक्ष प्रवेशामुळे येवल्यात राष्ट्रवादीची ताकद कमी होऊन शिवसेनेची ताकद वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी विशाल परदेशींसह सर्वांचे पक्षात स्वागत करत कामाला लागण्याचे आवाहन केले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडी बंद असा निर्णय घेतला आहे. वरिष्ठांकडून याबाबत सांगण्यात आले होते. महायुतीतील घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. तरी देखील महायुतीमधील घटक पक्षांतील नेते आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरूच आहे. त्यामुळे महायुतीत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे्

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

लग्नाचं आनंदी वातावरण क्षणात दुःखात बदललं; डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT