Prakash Ambedkar - Uddhav Thackeray
Prakash Ambedkar - Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray-Ambedkar : उद्धव ठाकरेंना ३ दिवसांत दुसरा धक्का; आधी शिवसेना, धनुष्यबाण हातातून सुटला, आता 'वंचित' साथ सोडणार?

अॅड. जयेश गावंडे

अकोला : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि गटावर मोठं राजकीय संकट कोसळलं आहे. एवढ्या वर्षांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

कारण काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा झाली होती. मात्र आता ही आंबेडकर-ठाकरे यांच्यातील युती तुटणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या युतीनंतर वंचित-महाविकास आघाडीसोबत जाणार का? असा सवाल जनसामान्यांना पडला आहे. यावर महाविकास आघाडीत चर्चा सुद्धा सुरू आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीची युती ही उद्धव ठाकरेसोबत असून महाविकासआघाडी सोबत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचं मनोमिलन कायम राहिलं तर आम्ही पुन्हा एकटे राहणार असं सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. याचाच अर्थ म्हणजे भविष्यात वंचित बहुजन आघाडीची एकला चलोची मानसिकता आता पासूनच असल्याचं दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

Viral Video: अरेरे! 'नवी कोरी' कार घेतली; पठ्ठ्याने दारात आणण्याआधीच वाट लावली.. थरारक VIDEO

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT