Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Yugendra Pawar News : मावळात जे आमदार आहेत त्यांचे खरे बॉस बारामतीत", युगेंद्र पवारंचा शेळकेंना टोला

Maharashtra Political News : मावळातील बैठकीत युवा नेते युगेंद्र पवार यांनी “आमदारांचे खरे बॉस बारामतीत बसले आहेत” असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. या विधानामुळे मावळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • मावळातील राष्ट्रवादी शरद गटाच्या कार्यकर्ता बैठकीत युगेंद्र पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • “खरे बॉस बारामतीत आहेत” या विधानाने मावळात राजकीय खळबळ उडाली आहे.

  • या बैठकीला जिल्हाध्यक्ष, युवक नेते व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळच्या राजकारणात वातावरण तापले आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरु आहे. अशातच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे वडगाव मावळ मध्ये झालेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत वातावरण चांगलंच तापलं. या बैठकीत बोलताना युवा नेते युगेंद्र पवार यांनी मावळातील आमदार सुनील शेळके आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट नाव न घेता जोरदार टोला लगावला.

काय म्हणाले युगेंद्र पवार ?

कार्यकर्ता आढावा बैठकी दरम्यान उगेंद्र पवार म्हणाले, “बारामतीमध्ये आताही मोठ्या प्रमाणात दहशत आहे. मावळात जे आमदार आहेत त्यांचे खरे बॉस बारामतीत बसले आहेत,” असे वक्तव्य करून युगेंद्र पवार यांनी अजित पवार आणि आमदार सुनील शेळके यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाच चढवला.

या बैठकीला कोण उपस्थित होते ?

कार्यकर्ता आढावा बैठकीस पुणे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे. मावळचे अध्यक्ष दत्ता पडवळ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

मावळातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी रणनीती, आगामी निवडणुकांची तयारी आणि स्थानिक प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यामुळे मावळच्या राजकारणात चांगलाच खळबळजनक चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thalapathy Vijay: 'करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या भावा-बहिणी...'; रॅलीतील चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय यांची पहिली प्रतिक्रिया

Pune News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला, पुण्यातील भाजी विक्रेत्याने केली लाखोंची मदत

आधी दुचाकीवरून जाताना अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्र्यांची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update : झाडांवर सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब, शेतकरी हतबल

HBD Ranbir Kapoor : 'ब्रह्मास्त्र 2' ते 'रामायण', रणबीर कपूर कोण कोणत्या चित्रपटात झळकणार?

SCROLL FOR NEXT