Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Raigad Pali News : पाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासात हरवलेली बॅग शोधून ४ लाख रुपये आणि महत्त्वाचे चेक सुरक्षित परत केले. प्रामाणिक नागरिकाच्या मदतीने पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली.
Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक
Raigad NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईचे रहिवासी प्रमोद देऊळकर यांची ४ लाख रुपये आणि चेक असलेली बॅग पालीत हरवली.

  • पाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अवघ्या काही तासात बॅग शोधून दिली.

  • प्रामाणिक नागरिकाच्या मदतीमुळे प्रमोद यांना बॅग सुरक्षित मिळाली.

  • “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रिदवाक्य पाली पोलिसांनी कृतीतून दाखवून दिलं.

अमित गवळे, रायगड

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे खाकी वर्दीचं ब्रिदवाक्य पाली पोलिसांनी सत्यात उतरवलं आहे. मुंबईचे रहिवासी असलेल्या प्रमोद गणपत देऊळकर यांची बुधवारी जमीन खरेदीसाठी आणलेली चार लाख रुपये रोख रक्कम आणि बँकेचे महत्त्वाचे चेक असलेली बॅग हरवली होती. मात्र पाली पोलिसांनी ती अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत प्रमोद देऊळकर यांना परत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद देऊळकर यांनी पाली येथील जांभूळपाडा येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी लागणारी चार लाख रुपये रोख रक्कम आणि कॅनरा बँकेचे सही केलेले तीन कोरे चेक त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले होते.बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास देऊळकर पाली येथील विठ्ठल मंदिर परिसरातून जात असताना त्यांची ही बॅग हरवली.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक
Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

तातडीने त्यांनी पाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी आणि पोलीस शिपाई गौरव भापकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी देऊळकर यांच्यासोबत ज्या ठिकाणी बॅग हरवली होती त्या परिसराची पाहणी केली. दुकानदारांशी आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी चौकशी केली असता एका व्यक्तीने ती बॅग उचलून नेल्याची माहिती मिळाली.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक
Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवली आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा फोन नंबर मिळवला. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून विचारपूस केली असता त्याने प्रामाणिकपणे बॅग सापडल्याचे सांगितले आणि ती पोलिसांकडे जमा केली. तपासणी केली असता बॅगेत देऊळकर यांचे चार लाख रोख रक्कम आणि तिन्ही चेक सुरक्षित असल्याचे आढळून आले.

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक
Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

पोलिसांनी प्रमोद देऊळकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या हस्ते त्यांची बॅग, रोख रक्कम आणि महत्त्वाचे चेक परत केले. पोलिसांनी केलेल्या या जलद तपासामुळे आणि मदत करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीमुळे देऊळकर यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलीस पथकाने अवघ्या अर्ध्या तासात ही बॅग शोधून काढल्यामुळे त्यांच्या कामाची प्रशंसा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com