Chandrashekhar Bavankule saam tv
महाराष्ट्र

Kharghar Heatstroke News : दुर्घटनेची अनेक कारणे आहेत...; खारघर दुर्घटनेप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली कारणे

Political News : या सर्वांवर आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडलेल्या घटनेत अनेक कारणे असल्याचं म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Chandrashekhar Bawankule : खारघर दुर्घटनेमुळे राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने आरोपंच्या फैरी झडत आहेत. खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला असून मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सर्वांवर आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडलेल्या घटनेत अनेक कारणे असल्याचं म्हटलं आहे. (Political News)

जो कार्यक्रम होता तो नियोजित होता. काही लोकं २४ तास आधीच आले होते. या घटनेला अनेक कारणे आहेत. आमची जबाबदारी आहे कारण सरकारने व्यवस्था केली होती. लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता अप्पासाहेब यांना बघण्यासाठी आले होते, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

घटना होऊन गेली आता काय करता येईल आणि या परिवाराच्या मागे सरकार कशा प्रकारे उभे राहील हे बघायला हवं, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

पुढे संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बावनकुळेंनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले तर संजय राऊत यांचा आनंद गगनात मावेना होतो. राज ठाकरे यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलतात! असे बोलणे योग्य आहे का? राज ठाकरे यांची टीका प्रॅक्टिकल असते हवेत गोळीबार नसतो. ते आमच्यावर सुद्धा टीका करतात. राऊत यांना सत्तेची सवय झाली होती मात्र ती गेली आणि आता संघटना वाढत नाही, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT