Prime Minister Narendra Modi  saam tv
महाराष्ट्र

Marathi Prime Minister : १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार, माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य

Political earthquake statement by former Maharashtra CM : १९ डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मराठी माणूस पंतप्रधान होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Prithviraj Chavan On Marathi Pm Modi Latest News : देशात राजकीय भूकंप होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. १९ डिसेंबरला मराठी माणूस हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असेही चव्हाण म्हणाले. मराठी माणूस पंतप्रधान होईल. पण तो काँग्रेसचा नाही तर भाजपचा असेल असे दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अमेरिकन संसदेने १९ नोव्हेंबरला एक कायदा केला आहे. त्या कायद्यानुसार १९ डिसेंबरला एक डाटा पब्लिश केला जाणार आहे. त्या कायद्यानुसार अमेरिकेमध्ये एका इजराइलच्या गुप्तचर एजंटने आपल्या घरात कॅमेरे लावून गुप्त व्हिडिओ रेकॉर्डिंग गोळा केली आहे. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. त्यातील काही नावे सध्या सोशल मीडियावर देखील समोर आली आहेत. ती छायाचित्र आणि व्हिडिओ अमेरिकन संसद १९ डिसेंबरला जाहीर करणार आहेत. त्या संदर्भातील जवळपास 75 हजार छायाचित्र आणि 20000 ईमेल आता सध्या समोर आली आहेत. अमेरिकन संस्थेने ही सर्व माहिती प्रकाशित केल्यानंतर एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि त्यानंतर आपल्या देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होऊ शकतो असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड शहरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना केला आहे.

इंडिगो एअरलाइन्स भाजप सरकारला ५८ कोटी रुपयांची देणगी देऊन जनतेला वेठीस धरलं

इंडिगो एअरलाइन्सने भाजप सरकारला ५८ कोटी रुपयांची देणगी देऊन सर्वसामान्य भारतीय जनतेला वेठीस धरलं. ज्या कंपनीचे भारतीय हवाई क्षेत्रात ६५% शेअर्स आहेत, त्या कंपनीने घोटाळा करून ५००० ची तिकीट पन्नास हजार रुपयाला विकली. कुणाला आपल्या कामानिमित्त बाहेर जाता आलं नाही, काही लोकांना आपल्या नातेवाईकांच्या पार्थिवासोबत विमानतळावर तात्काळत उभं राहावं लागलं. ही वेळ भाजप सरकारमुळे आली असा दावा देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT