Raigad News Saam Tv
महाराष्ट्र

रायगडमधील संशयास्पद बोटीमुळे पोलीस यंत्रणा हाय अलर्ट; मुंबईसह पुण्यात नाकाबंदी

बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 व लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - हरीहरेश्वर येथे समुद्रकिनारी मिळालेल्या बोटीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील (Sindhudurg) पोलीस यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे. काल सायंकाळ पासून समुद्रकिनारी भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. किनारपट्टी भागात जेथे जेथे होड्या लँडिंग होतात त्यासर्व ठिकाणी तसेच सर्व हॉटेल्स, लॉजेसची तपासणी करण्यात येत आहे.

स्थानिक मच्छीमार, सागर रक्षकदल सदस्य, वॉर्डन यांना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी कडक तपासणी सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील गोवा सीमेलगत इन्सुलि तपासणी नाक्यावर पोलीस (Police) बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

गोव्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. किनारी भागात पोलीस कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत. या घटनेमुळे महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड मुंबईसह पुण्यात देखील हाय अलर्ट जारी केला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह पुण्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.

आज सकाळपासून हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्याने परिसरात भीतीचे वातारावण निर्माण झाले आहे. काल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तीन एके-47 रायफल असलेली एक संशयास्पद बोट जप्त केली. यानंतर राज्यातील प्रमुखांनी याबाबत खुलासे केले. हे सर्व प्रकरण महाराष्ट्र ATS कडे देण्यात आलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

Aloe Vera: कोरफडीचे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

खान्देशात शरद पवार गटाला धक्का! बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश; पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनीही दिली साथ

SCROLL FOR NEXT