RTE Admissions Saam TV
महाराष्ट्र

Fake Document For RTE Admission : शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे RTE अंतर्गत प्रवेश, १७ पालकांवर गुन्हा

Fake Document For school admission : नागपुरात आरटीई कायद्याअंतर्गत नामांकित प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात अनेक पालक आरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याचदरम्यान, नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपुरात आरटीई कायद्याअंतर्गत नामांकित प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या १७ पालकांवर सिताबर्डी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात आरटीई अंतर्गत कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या पालकांविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी १७ पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या पालकांची शक्यता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिक मागास असलेल्या कुटुंबीयांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. नागपुरात काही पालकांनी खोटे पत्ते, जात प्रमाणपत्र या सारखे कागदपत्र दलालांकडून तयार करून नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता.

शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही. तरी यात बनावट कागपत्र तयार करून देणाऱ्या दलालाचा शोध सुरु आहे.

पोलीस उपायुक्त राहुल मदने काय म्हणाले?

पोलीस उपायुक्त राहुल मदने सांगितले की, शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही बनावट कागदपत्रे बनवली होती. ११ पालकांची चौकशी झाल्यानंतर त्यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचे आढळून आले. या पालकांनी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आतापर्यंत १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवेश देताना दलालांची मदत घेतल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी इतर कोणी शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का, याची तपासणी सुरु केली आहे'.

'आम्ही आणखी पालकांची चौकशी करणार आहोत. यात आरोपीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शाळेच्या विभागाने कागदपत्रे पडताळणी केली पाहिजे. काही कागदपत्रांमध्ये त्रृटी आढळल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार करावी, असे त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT