Mahadev Betting App: महादेव बेटिंग अँप प्रकरण: नारायणगावातील ३ मुख्य आरोपी अटकेत; मध्यप्रदेशमधून मुसक्या आवळल्या

Mahadev Betting App Case: देशभरात गाजलेल्या महादेव बेटिंग अप प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचे पुणे कनेक्शन उघड झाले होते. नारायणगाव येथील कॉल सेंटरप्रकरणात मुख्य ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Mahadev Betting App: महादेव बेटिंग अँप प्रकरण: नारायणगावातील ३ मुख्य आरोपी अटकेत; उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या
Police Raids Building In Narayangaon And Arrest Suspects in Mahadev App Betting CaseSaam Digital

पुणे, ता. २१ मे २०२४

देशभरात गाजलेल्या महादेव बेटिंग अप प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचे पुणे कनेक्शन उघड झाले होते. पुण्याजवळील नारायणगाव येथे एका कॉल सेंटरवर छापा टाकत तब्बल ९० जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून नारायणगाव येथील कॉल सेंटरप्रकरणात मुख्य ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच नारायणगाव येथे महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही धडक कारवाई करत तब्बल ९० जणांना अटक केली होती. या प्रकरणी आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून मुख्य तीन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये या तिघांना अटक करण्यात आली आहे.

महादेव बेटिंग अँप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९३ जणांना अटक केली असुन फरार असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. राज बोकारिया, ऋत्विक कोठारी, मोहमद पठाण असे अटक करण्यात आलेल्या तीन मुख्य सुत्रधारांची नावे आहेत. या तिघांच्या नियंत्रणाखाली नारायणगाव येथे कॉल सेंटर चालवले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

Mahadev Betting App: महादेव बेटिंग अँप प्रकरण: नारायणगावातील ३ मुख्य आरोपी अटकेत; उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या
Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार

दरम्यान, महादेव बेटिंग अप प्रकरण सध्या देशभर चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये महादेव बेटिंग ॲपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mahadev Betting App: महादेव बेटिंग अँप प्रकरण: नारायणगावातील ३ मुख्य आरोपी अटकेत; उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या
Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com