police arrests swabhimani shetkari sanghatana karyakarta in kolhapur saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti : 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरुच; राजू शेट्टी आज आंदाेलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे आज भव्य मेळावा हाेणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

काेल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana andolan in kolhapur latest marathi news) पदाधिका-यांवर आणि कार्यकर्त्यांवर पाेलीसांची करड नजर आहे. जयसिंगपूर आणि काेल्हापूरात पाेलीसांनी काही आंदाेलकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आज (बुधवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आंदाेलनाची पुढील दिशा निश्चित करणार आहेत. त्यामुळे शेट्टींच्या भूमिकेकडे शेतक-यांसह प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

ऊस दराचा तोडगा न निघाल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushriff) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविल्या प्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना जयसिंगपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांना आज जामिनासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे, संपर्कप्रमुख भिमगोंडा पाटील यांचेसह प्रमुख कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हाध्यक्षांसह पाच ते सहा कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पेठ वडगाव येथे पोलिसांनी आज सकाळी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. आज राजू शेट्टी हे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. आज सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे भव्य मेळावा हाेणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सायंकाळी जयसिंगपूर ते हुपरी येथे भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये दुसरा हप्ता आणि यावर्षी 3500 उसाला दर मिळावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT