ambernath , idbi bank
ambernath , idbi bank saam tv
महाराष्ट्र

IDBI BANK ची ६३ लाखांची फसवणूक, मास्टरमाइंड युवतीसह सात अटकेत

अजय दुधाणे

Ambernath Crime News : अंबरनाथमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्ज घेत आयडीबीआय बँकेला (idbi bank) ६३ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (shivajinagar police station) सात जणांच्या टोळीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाइंड आहे. (Maharashtra News)

नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे इथल्या जयंत बंडोपाध्याय यांचं घर खरेदी रिसेल प्रॉपर्टी म्हणून खरेदी करायचं होतं. त्यासाठी त्यांच्याच तोंडओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडून त्यांची आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेतली.

त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला, तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती, त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट अकाउंट नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आलं.

इकडे आयडीबीआय बँकेनं दिशा पोटे यांची कागदपत्रं तपासून त्यांचं कर्ज मंजूर केलं आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये वर्ग झाली. यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेनं पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं बँकेनं बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी बंडोपाध्याय यांनी आपलं घर विकायचं आहे हे जरी खरं असलं, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून आपलं आयसीआयसीआय बँकेत अकाउंटसुद्धा नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं चक्रावलेल्या आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँकेत धाव गबेत तिथले रेकॉर्ड तपासले असता तिथे नाव बंडोपाध्याय यांचं, मात्र फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आलं.

त्यामुळं हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचं लक्षात येताच आयडीबीआय बँकेनं अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी नवी मुंबईच्या शब्बीर सय्यद मोहम्मद पटेल या बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं.

त्याच्या चौकशीतून रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा सुगावा लागताच या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रं बनवून देणारे कुणाल नानजी जोगडीया आणि किशोर प्रवीण जैन या दोघांना अटक करण्यात आली. तर सर्वात शेवटी बंडोपाध्याय म्हणून अकाउंट उघडणाऱ्या राजेंद्र वामन शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या सर्वांच्या ताब्यातून पोलिसांनी अपहार झालेल्या रकमेपैकी जवळपास ४३ लाख रुपयांचं सोनं आणि ९ मोबाईल हस्तगत केले. आज सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

या सातही संशयित आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कर्ज ज्यांच्या नावावर घेण्यात आलं, त्या दिशा पोटे यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय. मात्र त्यांचा खरोखरच या गुन्ह्यात सहभाग आहे का? त्यांना फसवणुकीची माहिती होती का? या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असून त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अटक आरोपींकडून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आणखी २ गुन्हे उघडकीस येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT