Crime News, Latur, Gram Panchayat Elections 2022
Crime News, Latur, Gram Panchayat Elections 2022 SaamTv
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections 2022 : सरपंचपदासाठी रस्सीखेच, जावळीत राडा; पाच अटकेत

दीपक क्षीरसागर

Gram Panchayat Elections 2022 : लोकांना पैसे वाटप करीत असल्याचा संशय घेऊन शिवीगाळ करीत दगड व लोखंडी रॉडने मारून पाच-सहा जणांना जखमी केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जावळी येथे घडली आहे. या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latur Latest Marathi News)

औसा तालुक्यातील जावळी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. सरपंचपद (sarpanch) हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे रस्सीखेच वाढली आहे. प्रत्येक जण आपण निवडून यावे, म्हणून जोरदार प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान गुरुवारी रात्री ११ वा.च्या सुमारास फिर्यादी शंभुराजे माधवराव भोसले यांच्यावर पैसे वाटप करीत असल्याचा संशय घेऊन संशयित आरोपी तानाजी ज्योतीराम सुरवसे, अलिम अमिन पटेल, व्यंकट संभाजी आळणे, गफार बर्शीद सय्यद, आशिफ गफार सय्यद, जावेद जाफर सय्यद, शफिक मुक्रम सय्यद, मेहराज फतरु पटेल यांनी गैरकायद्याने एकत्र जमत फिर्यादीस आणि सय्यद सत्तार अब्दुल, तातेराव गुंडाजी कांबळे, दास ग्यानदेव भोसले व इतरांना रस्त्यात अडविले.

तुम्ही लोकांना पैसे वाटता, म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, तसेच लोखंडी रॉडने मारले. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी विविध कलमांन्वये आठ जणांविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक (arrest) करण्यात आल्याचे उस्तुर्गे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT