Beed : धक्कादायक! शाळेच्या सहलीवरून घरी परतताच विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण समजताच सर्वांना बसला धक्का

बीडच्या बीडसांगवी गावातील धक्कादायक घटना
Ashti Police Station
Ashti Police StationSaam Tv

Beed News : बीडमध्ये एका 15 वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील बीडसांगवी या गावात उघडकीस आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार मुलाने पब्जी गेमच्या व्यसनामधून इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ashti Police Station
Satara : साताऱ्यात राजकारण तापलं; आमदारांच्या बहिणीच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात हा विद्यार्थी शिक्षण घेतो. कृष्णाचे हे वडिल ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघे घरीचं असतात. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता.

मात्र त्यानंतर तो सहलीवरून घरी आल्यानंतर झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी कडी आवळत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

Ashti Police Station
MVA Morcha : महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाची चार प्रमुख कारणे...

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, अंमलदार बब्रुवान वाणी यांनी पंचनामा केला. कृष्णाने पब्जी या गेमच्या व्यसनातून आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com