- अमर घटारे
Amravati DCC Bank : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यहराबाबत बँकेचे संचालक तथा आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत बॅंकेत सुरु असलेल्या चुकीच्या कारभाराचा पाढा वाचला. त्यातून काही माेठे आरोप देखील आमदार कडू यांनी केले आहेत. (Bacchu Kadu Latest Marathi News)
बँकेने सन २०१७-२० या वर्षात म्युच्युअल फंडात जवळपास ११०० कोटीची गुंतवणूक केली. ती गुंतवणूक डायरेक्ट मोडमध्ये कोणत्याही एजंट व मध्यस्थ्याशिवाय करण्याचा ठराव असताना त्या वर्षात पाच एजंट बँकेमार्फत काम पाहत होते. त्या एजंटला एकत्रित ३,४२ कोटी रुपये कमिशन मिळाले. त्यामुळे ते कमिशन नेमके कुणाला मिळाले याची चौकशी झाली पाहिजे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
सद्यस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेला (dcc bank) जो स्टे मिळाला आहे. त्यामध्ये न्यायालयाने कलम ८३ व ८८ ची चौकशी थांबवली असे कुठेही नमूद केलेलं नाही. तर दुसरीकडे बँकेने चुकीची माहिती देऊन न्यायालयाची (court) दिशाभूल केली असे असले तरी बँकेवर नियमाने होणारी कारवाई थांबवता येणार नाही अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. १५० ते १६० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असताना ९०० कोटीची गुंतवणूक केली त्यामुळे बँक वादात सापडली आहे असेही त्यांनी नमूद केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.