- विनायक वंजारे
Nitesh Rane : माझ्या छोट्याशा वक्तव्याने लाखोंची प्रसिद्धी मला मिळाली. मी त्या वक्तव्यात मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. माझ्या आणि माझ्या मतदारांमध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये असा स्पष्ट इशारा आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी विराेधकांना दिला आहे. नांदगाव ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या वक्तव्यावरुन राणेंवर विराेधकांना टीका केली. त्यास आज राणेंनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेतून वक्तव्यावर ठाम राहत विराेधकांना इशारा दिला.(Maharashtra News)
आमदार नितेश राणे म्हणाले माझ्यावर माझे मतदार त्यांचा राग हक्काने काढतात. तसेच मी देखील त्यांना कधी काही वाटलं तर रागवत असताे. माझ्या वक्तव्याने मतदारांना काहीही चुकीचं वाटलं नाही. गल्लीपासून दिल्लीत पर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे. त्या पक्ष्याला मतदान केलं नाही तर विकास कसा होणार याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असेही राणेंनी नमूद केले.
पनवेल ते सिंधुदुर्ग भाजपचा एकमेव आमदार
खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधी पक्षात आहेत. ते कोणतीही केंद्र सरकारची योजना, निधी आणू शकत नाही. आमदार वैभव नाईक एक रुपयांचा निधी तरी आपल्या मतदारसंघात आणू शकले का ? निधी देणारे सर्व मंत्री जर भाजप पक्षाचे असतील तर मी काय चुकीचे बोललो ? पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत मी भाजपचा एकमेव आमदार आहे.
तर चुकीचं ठरलं असतं
मग मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का, माझे नेते माझं ऐकणार नाही का ? या सर्वांची जाणीव मी माझ्या मतदारांना करून दिली असेन तर त्यात काही चुकीचं नाही. जाहीर सभेत मी असं वक्तव्य केलं असतं तर चुकीचं ठरलं असतं असेही राणेंनी स्पष्ट केले. (Tajya Batmya)
मी पाठवलेले प्रस्ताव नाकारले जायचे
उद्धव ठाकरे (uddhav thackeray) मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात वैभव नाईक आणि विनायक राऊत (vianyak raut) यांनी कणकवलीत किती निधी दिला ? मी पाठवलेले प्रस्ताव नाकारले जायचे. मी केलेल्या वक्तव्यात काहीच चुकीचं नाही. हक्काने केलेलं वक्तव्य आहे. माझ्या पुरस्कृत पॅनलला जे मतदान करतील, निवडून देतील त्यांना भरघोस निधी देणार असा पुनरुच्चार आज राणेंनी पुन्हा केला.
वैभव नाईक आणि विनायक राऊत हे विरोधक म्हणून आपलं काम करत आहेत. वैभव नाईकची (vaibhav naik) ओळख राणेविरोधक आमदार अशीच आहे. अडचणीचा प्रश्न विचारल्यामुळे आदित्य ठाकरे शी म्हणून पळून गेले. तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू नका. लहान मुलांना असे प्रश्न विचारू नयेत असेही राणेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.