Dharashiv Naldurg Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: भररस्त्यातून तरुणाचे फिल्मी स्टाइल अपहरण; पोलिसांकडून ८ तासांतच सुटका, धाराशिवमध्ये काय घडलं?

Dharashiv Crime News: धाराशिवच्या नळदुर्ग परिसरातून तरुणाचे फिल्मी स्टाइल अपहरण, पोलिसांनी ८ तासांतच आरोपींना अटक केली.

Satish Daud

Dharashiv Naldurg Crime News

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरात मंगळवारी (२३ जानेवारी) दुपारच्या सुमारास एक भयानक घटना घडली. विहिरीवरील मुरूम रोडच्या कामासाठी पाहिजेत, तुम्हाला विकायचा आहे का? असं म्हणत अज्ञात आरोपींनी एका तरुणाला कारमध्ये बसवलं. त्यानंतर सुसाट वेगाने कार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील डोंगराळ परिसरात नेली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिथे आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत ४ लाखांची खंडणी मागितली. इतकंच नाही, तर त्यांनी तरुणाच्या पत्नीला फोन करून पैसे द्या, अन्यथा तुमच्या पतीला संपवून टाकू अशी धमकी देखील दिली. या घटनेनंतर महिलेने तातडीने पोलिसांत (Police) धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच तरुणाची सुखरुप सुटका केली. चारही आरोपींवर अपहरण तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सुधीर शिवाजी राठोड असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते पाटील तांडा खुदावाडी परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फोन करून सुधीरला पाटील तांडा येथील जिजामाता बालकाश्रम परिसरात बोलावून घेतले होते.

तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्याला कारमध्ये बसवले. त्यानंतर सुसाट वेगाने कार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथच्या दिशेने नेली. तिथे गेल्यानंतर आरोपींनी सुधीरला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे ४ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, सुधीरच्या पत्नीने वेळीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT