Pune Crime News: पुण्यात चिकन विक्रेत्याची दहशत, भररस्त्यात अनेकांवर सुऱ्याने हल्ला; दोन पोलीस जखमी

Pune Narhe Latest Crime News: पुण्यातील नऱ्हे परिसरात चिकन विक्रेत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक सुरा घेऊन हल्ला चढवला. या घटनेत दोन पोलिसांसह काहीजण जखमी झाले.
Pune Narhe Area Crime News
Pune Narhe Area Crime NewsSaam TV
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे २४ जानेवारी २०२४

Pune Narhe Area Crime News

चिकन विक्रेत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक सुरा घेऊन हल्ला चढवला. या घटनेत दोन पोलिसांसह काहीजण जखमी झाले. अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात मंगळवारी (२३ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Narhe Area Crime News
Talathi Final Selection: राज्यातील तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर; उमेदवारांच्या आक्षेपांचं काय झालं?

घटनेनंतर पोलिसांनी चिकन विक्रेत्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. राहुल सैफुद्दीन शेख, असं हल्ला करणाऱ्या चिकन विक्रेत्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचे नऱ्हे गावात (Pune News) चिकन विक्रीचे दुकान आहे. सोमवारी आरोपी दुकानात बसून सुरा फिरवत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही.

यामुळे मंगळवारी आरोपीची हिंमत आणखीच वाढली. त्याने थेट रस्त्यावर उतरून नागरिकांवर सुऱ्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली. स्थानिकांनी या घटनेची माहिती सिंहगड पोलिसांना दिली.

माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपीने दोन पोलिसांवर देखील सुऱ्याने हल्ला चढवला. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर इजा झाली नाही. मात्र, दोन पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले आहेत.

Pune Narhe Area Crime News
Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com