Nagar-Kalyan Highway: नगर-कल्याण महामार्गावर ट्रॅक्टर-एसटी बसचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Nagar-Kalyan Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Nagar-Kalyan Highway Accident
Nagar-Kalyan Highway AccidentSaam TV
Published On

Nagar-Kalyan Highway Accident News

अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagar-Kalyan Highway Accident
Pune Crime News: पुण्यात चिकन विक्रेत्याची दहशत, भररस्त्यात अनेकांवर सुऱ्याने हल्ला; दोन पोलीस जखमी

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्यानजीक मध्यरात्री अपघात झाला.

अपघात इतका भीषण (Accident) होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Nagar-Kalyan Highway Accident
Daily Horoscope: रवि योगाच्या शुभ संयोगामुळे ५ राशी होणार मालामाल; प्रत्येक कामात मिळणार यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com