shirdi crime news saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime: साईंच्या दर्शनासाठी निघाले, कारला ओव्हरटेक करुन भक्तांना थांबवले, बंदूकीचा धाक दाखवून लूटलं, पोलिसांनी...

Shirdi Crime Update: काही दिवसांपूर्वी शिर्डीला जाणाऱ्या साईभक्ताची गाडी अडवून एका टोळीने जबरदस्त लूट केली होती. मात्र, कोपरगाव पोलिसांनी सापळा रचून त्या टोळीला अखेर गजाआड केले.

Saam Tv

सचिन बनसोडे,साम टीव्ही

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात साईभक्तांच्या गाडीला अडवून बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 9 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत कारद्वारे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली

यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली. मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते.यानंतर मोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेली घटना सविस्तर सांगितली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्यांनंतर पोलिसानी पुढील तपास सुरू केला.

घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून विजय जाधवसह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम, राहुल संजय शिंगाडे, सागर दिनकर भालेराव, समीर रामदास माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

या घटनेतील आरोपींनी या आगोदरही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात वाटून घेत सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे. रस्तालूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१५ लाखांच्या अपूर्ण वचनासारखी फसवी ठरू नये, मोदींच्या योजनेवर युवकांच्या प्रतिक्रिया, काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील बदनापुर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

Tesla Y Model : भारतीय बाजारात अवतरलेल्या टेस्ला कारचे भन्नाट फीचर्स; फीचर्स ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

SCROLL FOR NEXT