Shirdi Crime News: शिर्डीमध्ये साई भक्ताला गंडा, एजंटने लावला चुना, दाखल झाला गुन्हा

Shirdi Sai Devotee Scammed by Agent for: शिर्डीमध्ये परदेशातून आलेल्या साईभक्ताला एका एजंटने तब्बल साडेचार हजारला गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एजंटसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
shirdi scam news
shirdi scam newssaam tv
Published On

सुशील थोरात,साम टीव्ही

शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या ब्रिटन येथील साईभक्ताची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बलदेव राममेन हे आपल्या कुटुंबियांसह शिर्डीत साईदर्शनासाठी आले होते. मात्र, पूजा साहित्याच्या नावाखाली त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली. पाचशे रुपयांचे पूजा साहित्य तब्बल चार हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीत घडला आहे.

shirdi scam news
Crime : बाप आहे की सैतान..! ३ महिन्याच्या चिमुकलीला फरशीवर आपटलं, जागेवरच जीव गेला, कुर्ला हादरले

ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बलदेव राममेन यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरीत कारवाई करत फसवणूक करणारे कमिशन एजंट प्रदीप त्रिभुवन आणि सूरज नरोडे यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच संबंधित दुकान मालक व जागा मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shirdi scam news
Crime : धक्कादायक! प्राचार्याचा अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, नगर हादरले

शिर्डीत कमिशन एजंट अनेक साईभक्तांची फसवणूक करत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. असे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने यांनी आश्वस्त केले आहे. शिर्डीत अशा एजंटांना स्थानिक पातळीवर ‘पॉलीशीवाले’ म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही भाविकांची फसवणूक होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेत भाविकांच्या लुटीला आळा घालण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com