Shirdi Murder Case: शिर्डी हत्याकांड प्रकरणी मोठी लीड; आणखी एक आरोपी जाळ्यात, ३६ तासापासून देत होता गुंगारा

Ahilyanagar Shirdi double murder Case : शिर्डी दुहेरी हत्याकांडात आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शिर्डी शहरातील काटवनात लपून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Shirdi Double Murder Case
Shirdi Double Murder CaseSaamTv
Published On

अहिल्यानगर : शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना काल पहाटे घडली. सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणाला ड्युटीवर येताना प्राणघात हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आले . या हल्ल्यात दोन सही संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे . दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आणखी एका जणाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

शिर्डी दुहेरी हत्याकांडात आतापर्यंत दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शिर्डी शहरातील काटवनात लपून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ३६ तासांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. कालपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होते शिर्डीत तळ ठोकून होते. हत्याकांडानंतर काल एकाला तर आज दुसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Shirdi Double Murder Case
Western Railway : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने, स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, VIDEO

नेमकी घटना काय?

देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली. यात एक तरुण गंभीर जखमी आहे. शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली. यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत. नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला. अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच मृत झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी आहेत. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीय.

Shirdi Double Murder Case
Suresh Dhas : मी राजीनामा मागितला नाही, आम्ही छोटे चिल्लर कार्यकर्ते; धनंजय मुंडेंवर सुरेश धस असे का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com