toll plaza, pandharpur wari, ashadhi wari saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2022 : पंढरपूरला निघालात ? टाेल माफीसाठी आमच्याशी संपर्क साधा, पाेलीसांचं आवाहन

येत्या रविवारी आषाढी एकादशी असल्याने राज्यभरातून भाविक पंढरपूरात दाखल हाेऊ लागले आहेत.

Siddharth Latkar

सातारा : आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) निमित्त वारकरी आषाढी वारीस (ashadhi wari) पंढरपूरला (pandhapur wari) जात आहेत. या वारक-यांच्या तसेच भाविकांच्या वाहनांना राज्य शासनाने 15 जूलैपर्यंत पथक करातून सूट म्हणजे टाेल माफी (toll waiver) जाहीर केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्याची सातारा जिल्ह्यात सात जूलैपासून अंमलबजावणी सुरु झाली. दरम्यान टाेल माफी (toll plaza) मिळावी यासाठी वारक-यांनी अथवा भाविकांनी सातारा पाेलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे. (ashadhi wari latest marathi news)

बन्सल (ajaykumar bansal) यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातून आनेवाडी टाेलनाका (anewadi toll) व तासवडे टाेलनाका (taswade toll) येथे भाविकांच्या पालख्या, हलक्या व जद वाहनांना असुविधा हाेऊ नये यासाठी पथकर सवलतीचे (टाेल माफीचे) स्टिकर्स देण्यात येणार आहेत.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर (pandharpur news) येथे जाणा-या भाविकांनी त्यांचे वाहनांना सवलतीचे स्टिकर्स पाेलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखा (सातारा), भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच आनेवाडी टाेल नाका व तासवडे टाेल नाका (toll plaza) येथे असुविधा निर्माण झाल्यास भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे तसेच टाेलनाका येथे उपस्थित असणारे पाेलीस अधिकारी किंवा अंमलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.

वारक-यांनी त्यांना काेणती अडचण आल्यास त्यांनी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.

पाेलीस नियंत्रण कक्ष 02162 - 233833

जिल्हा विशेष शाखा, सातारा 02162 - 234231

तळबीड पाेलीस ठाणे 02164 - 258333

भुईंज पाेलीस ठाणे 02167 285233.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT