Bus Fire update Saam tv
महाराष्ट्र

Bus Fire : क्षणात सर्व काही घडलं, पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बस आगीच्या भक्ष्यस्थानी; राज्यात दिवसभरातील तिसरी घटना

Bus Fire update : पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बसला आग लागली.राज्यात दिवसभरात तिसऱ्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

दिवसभरात तीन बसला लागली अचानक आग

पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा लागली बसला आग

शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतल्याचा अंदाज

बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राज्यात दिवसभरात तीन बसला आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आलं आहे. नागपूरनंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा बसला आग लागल्याची घटना घडली. पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा येथे धावत्या पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. पुणे येथून डांगेचौककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज दिवसभरातील ही तिसरी घटना आहे. या घटनेने बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात दोन बसला आग लागण्याचा घटनेने बसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित होत आहे. PMPML च्या ताफ्यात अनेक बस या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालवल्या जातात. आजच्या घटनेतील बस या कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत की PMPML च्या आहेत, हे समजू शकले नाही. परंतु यामुळे बसच्या सुरक्षितेतबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

बसने अचानक पेट घेतल्याने गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. बसला आग लागल्यानंतर सर्वजण सुखरूप बाहेर पडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. यामध्ये काळेवाडी मार्शल वाकड मार्शल सांगवी ट्राफिक डिव्हिजन यांचा आग विझविण्यासाठी मोलाचा वाटा होता.

नागपुरात धावत्या बसला आग

नागपूर-उमरेड रोडवर धावत्या खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. नागपूर उमरेड मार्गावरील VIT कॉलेज ते उकळवाही हेटीदरम्यान खासगी बसला अचानक आग लागली. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. सुदैवाने सर्वजण एकाच वेळी बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बस चालकाने तातडीने बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवलं. पुढे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT