पुणे : रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) या दोन्ही देशांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. रशियाकडून युक्रेनवर दररोज हल्ले केले जात आहेत. या युद्धाच्या सावटाखाली भारतातून युक्रेनमध्ये (Ukraine) वैद्यकीय शिक्षणासह इतर शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो विद्यार्थी अडकले आहेत. जीव मुठीत धरून अद्यापही अनेक विद्यार्थी युक्रेनच्या विविध भागात अडकले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या मायदेशी आणण्यात देखील आले आहे.
हे देखील पहा :
या युद्धाच्या दुष्टचक्रात नवीन शेखराप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा (Student) गोळीबारात मृत्यू (Death) देखील झाला आहे. त्यामुळे युक्रेनमधील सर्व भारतीय विद्यार्थी सुखरूप देशात परत येईपर्यंत पंतप्रधानांनी निवडणूका आणि उद्घाटने बाजूला ठेवावीत आणि आपण फक्त भाजपाचे नेते नसून येथील सर्व जनतेचे पंतप्रधान आहोत याचे भान ठेवावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव अक्षय जैन (Akshay Jain) यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाचे प्रमूख आहेत की फक्त भाजपाचे? असा सवालही अक्षय जैन यांनी उपस्थित केला आहे. युक्रेन मधील संभाव्य यूद्ध परिस्थितीची पूर्वकल्पना असूनही वेळीच पावले न उचलल्यामूळे भारतातील वीस हजार विद्यार्थ्यांचा प्राण धोक्यात घालून आपला जीव वाचविण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याचा आरोपही युवक काँग्रेसकडून (Yuvak Congress) करण्यात आला.
एकीकडे विद्यार्थी मृत्यूच्या सावटाखाली असतानाच दूसरीकडे आपले पंतप्रधान दिल्लीच्या मंदीरात खंजर वाजवत बसले होते. देशभरातून याबाबत आक्रोश निर्माण झाला. याच दरम्यान एका विद्यार्थ्याला आपल्या प्राणाला देखील मुकावे लागले. मात्र, पंतप्रधान आता या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून तीन दिवस वाराणसीला निवडणूक प्रचारासाठी तळ ठोकणार आहेत. कारण देशातील जनतेपेक्षा त्यांना खोटे श्रेय घेण्यात आणि निवडणूकातच (Elections) जादा रस असतो असा घणाघातही जैन यांनी केला.
जैन पूढे म्हणाले की, शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत भाजपच्या काही नेत्यांची मजल गेली असून भाजपच्या आयटी सेलवरून त्यांना बदनाम केले जात आहे. यामूळे देशाच्या पंतप्रधानपदाचे कधी नव्हे एवढे अवमूल्यन झाले आहे. किसान कायदे ही वेळेत मागे घेतले असते तर ७०० शेतकरी वाचू शकले असते. पुण्याची मेट्रो पूर्णपणे कार्यरत झाल्याशिवाय केवळ निवडणुकींवर डोळा ठेवून अर्धवट मार्गिकेचे त्यांनी उदघाटन करू नये. तसेच पुण्यात प्रचारार्थ आले तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा पंतप्रधांना तीव्र विरोध असेल असा इशाराही जैन यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.