pm should pays tribute to rajmata jijau on her jayanti visiting sindkhed raja demands maratha seva sangh saam tv
महाराष्ट्र

Sindkhed Raja: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिजाऊंना वंदन करण्यासाठी सिंदखेडराजाला यावं : मराठा सेवा संघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील नाशिकच्या दौऱ्यावर आहे.

संजय जाधव

Buldhana News :

ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) रायगडावर गेले होते त्या प्रमाणे त्यांनी सिंदखेडराजा येथे जिजाऊंना वंदन करण्यासाठी यावं अशी मागणी राजे लखूजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव व मराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. राजमाता जिजाऊंचा (Rajmata Jijau Jayanti) उद्या (शुक्रवार) 426 वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सिंदखेडराजा येथे सुरु आहे. (Maharashtra News)

उद्या सकाळी सहा वाजता राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात मुख्य शासकीय पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सिंदखेडराजा येथे विविध कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील नाशिकच्या दौऱ्यावर आहे. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडवर जाऊन वंदन केले त्याच धर्तीवर उद्या त्यांनी नाशिक ते सिंदखेडराजा हे अंतर फार कमी असल्याने येथे येऊन जिजाऊंना वंदन करावे अशी मागणी राजे लखूजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव व मराठा सेवा संघाचे संयाेजक राजेश कोल्हे यांनी केली.

काेल्हे म्हणाले दरवर्षी आम्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देत असतो. आता यापुढे पंतप्रधानांनाही निमंत्रण पाठवले जाईल. उद्या (12 जानेवारी) नाशिक येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे मात्र त्याचा जिजाऊ जन्मोत्सवावर कुठलाही परिणाम होणार नाही असे एका प्रश्नास उत्तर देताना काेल्हेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

French Fries Recipe: घरच्याघरी बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत अन् टेस्टी फ्रेंच फ्राइज

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

SCROLL FOR NEXT