संजय राठोड, यवतमाळ|ता. १ मार्च २०२४
माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने मतदारसंघात त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यवतमाळमध्ये येऊन बचत गटाच्या मेळाव्यात अब की बार चारशो पार चा नारा दिला. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या स्वागताच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचा फोटो नसल्याने महायुतीत फूट असल्याची चर्चा रंगली होती.
अशातच राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनिल नाईक ह्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या काही महिन्यांपासून मोहिनी नाईकांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढविण्यावर भर दिला आहेत. त्यामुळे मोहिनी नाईक भाजपमध्ये जाऊन लोकसभा निवडणूक लढवणार तर नाही ना अशी चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांच्याकडे आहे. त्यामुळे मोहिनी नाईक या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीत वादाची ठिणगी पडण्याचीही शक्यता आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.