PM Narendra Modi Speech At Tarkarli Beach in Sindhudurg On The Occasion of Shivaji Maharaj Statue Inauguration Program PM Narendra Modi latest Speech at Malvan in sindhudurg on Navy day 2023 - Saam tv
महाराष्ट्र

PM Narendra Modi Speech: नौदलातील पदांची नावे बदलणार, PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Narendra Modi latest Speech in sindhudurg: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातील पदांची नावे बदलणार असल्याची घोषणा केली. तसेच या पदांना भारतीय परंपरेची नावे देणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

Vishal Gangurde

PM Narendra Modi Speech in Sindhudurg:

'समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच सिंधुदुर्गच्या तारकर्ली येथील नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राजकोट किल्ल्यात पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. या अनावरण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोणत्याही देशात समुद्राचं सामर्थ्य महत्वाचं असतं. याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळं त्यांनी शक्तीशाली नौदल तयार केलं. त्यांचं मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत'.

नौदलाच्या पदाला भारतीय परंपरेची नावे देणार; मोदींची घोषणा

'भारताने गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. आता आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत. गेल्यावर्षी नौदलाचा ध्वजाचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं. हे माझं भाग्य समजतो. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा असेल. तसेच नौदलाच्या पदाला भारतीय परंपरेची नावे देणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

बोट बनविण्याची कला पुन्हा विकसित करण्याची गरज : मोदी

'नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या कमांडर ऑफिसर नियुक्ती केली आहे. शिवरायांचा वारसांचा पुढे नेत असताना बोट बनविण्याची कला पुन्हा विकसित करण्याची गरज आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर तारकर्लीच्या समुद्रात नौदलाने प्रात्यक्षिके केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

SCROLL FOR NEXT