Praful Patel Saam tv
महाराष्ट्र

NDA Cabinet Ministers: ब्रेकिंग! प्रफुल पटेलांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; उद्या घेणार शपथ

PM Modi Oath Ceremony: उद्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये शपथ घेणाऱ्या राज्यातील पहिल्या मंत्र्याचे नाव समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ८ जून २०२४

उद्या (रविवार, ९ जून) देशात नव्या सरकारचा स्थापना होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोबतच उद्याच्या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या पार पडणार आहे. राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रीपद आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रिय मंत्रीपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात प्रफुल पटेल हे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडूनही एक नेता मंत्रीपदाची शपथ घेईल.

शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आदी नेत्यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर भाजपकडून नारायण राणे, रक्षा खडसे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी केंद्रात कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपकडून गायिका अंजली भारती यांच्यावर कारवाईची मागणी

Union Budget 2026-27 : यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक, पहिल्यांदाच...; लाइव्ह अपडेट्स कधी आणि कुठे बघाल?

महायुतीने निकालाआधी उधळला गुलाल; कोकणात तब्बल २५ उमेदवार बिनविरोध

Mayor Election: महापौर निवड कधी होणार? संभाव्य तारखा आल्या समोर; मुंबई, पुण्याचा कधी ठरणार?

Fruits Benefits: सतत अपचनाचा त्रास होतो? मग रोज 'हे' फळं खल्ल्याने सगळे त्रास होतील दूर

SCROLL FOR NEXT