Narendra Modi News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीतील निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. '२०१४ पूर्वी आकडे फक्त भ्रष्टाचाराचे होते. २०१४ नंतर आकडे फक्त विकासकामाचे आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)
PM नरेंद्र मोदी म्हणाले, 'शिर्डीच्या पावन भूमीला कोटी कोटी नमन. 5 वर्षापूर्वी मंदिराला 100 वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हा दर्शनाची संधी मिळाली होती. लोक निळवंडे धरणाची पाच दशकापासून प्रतीक्षा होती, त्याचे ही जलपूजन केले. मंदिराच्या परिसरात दर्शन रांगेचे काम केले, त्याचेही लोकार्पण करण्याची संधी मिळाली'.
'हरिभक्त बाबा महाराज यांच्या वैकुंठ गमनच्या दुःखाची बातमी समजली. त्यांनी केलेले काम पुढील पिढीला मदत होईल. त्यांच्या शैलीने लोकांचे मन जिंकले होते. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', असे मोदी पुढे म्हणाले.
'आमचे सरकार सबका साथ सबका विकासाच्या मंत्रावर चालतं. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. 1 करोड 10 लाख लोक आयुष्यमान कार्डचे लाभ घेत आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख करोड खर्च केले, असे ते पुढे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार, कुंभार लोकांना मदत मिळाली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगतोय. २०१४ पूर्वी आकडे ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला. पण आम्ही विकास करतोय, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
'महाराष्ट्रात 26 हजार कोटी रुपयांचा लाभ हा आत्तापर्यंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळाला आहे. आता महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी लोकांना थेंबभर पाण्यासाठी तरसवले आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.