PM Modi Nashik Visit Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Nashik Visit: प्राचीन काळाराम मंदिरात PM मोदींनी केली साफसफाई, पाहा व्हिडिओ

साम टिव्ही ब्युरो

>> तबरेज शेख

Narendra Modi speech from Kalaram Mandir:

नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिकच्या निलगिरी बाग येथे हेलिपॅडवर त्यांचे सकाळी 11 वाजता आगमन झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिरची हॉटेल ते स्वामीनारायण चौकपर्यंत रोड शो केला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गंगा गोदावरीची आरती करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिर येथील दर्शन घेतले. नंतर पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिर परिसराची स्वच्छता केली. मंदिरात ठेवलेल्या अभिप्राय नोंदवहीमध्ये जय श्रीराम लिहून खाली नरेंद्र मोदी, अशी सही देखील त्यांनी केली. याची नोंद इतिहासात होणार आहे. कारण काळाराम मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरेल आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले की, ''भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा.  (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रम, सामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब तयार होत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे.

ते म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील २५ वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा, त्यासाठी युवकांनी संकल्प सोडावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी मेरा भारत- युवा भारत संघटन सुरू करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त युवक- युवतींनी नोंदणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT