PCMC News Saam tv
महाराष्ट्र

PCMC News : हक्काचं घर वाचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडक; चुकीचा आराखडा असल्याचा थेरगाव नागरिकांचा आरोप

Pimpri Chinchwad News : घनदाट लोक वस्ती असलेल्या थेरगाव परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेल्या चुकीच्या विकास आराखड्यातील रस्त्यांचा विरोधात हजारो नागरिक आज हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार दात लोकवस्तीत नवीन रस्ते टाकण्यात आले आहेत. मात्र महापालिकेने तयार केलेला आराखडा चुकीचा असल्याचा आरोप करत शहरातील थेरगाव परिसरातील हजारो नागरिकांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडक मोर्चा काढला आहे. तसेच या आराखड्याला विरोध केला आहे. 

घनदाट लोक वस्ती असलेल्या थेरगाव परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेल्या चुकीच्या विकास आराखड्यातील रस्त्यांचा विरोधात हजारो नागरिक आज हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. थेरगाव परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने विकास आराखडा च नावावर दाट लोकवस्ती असलेल्या परिसरामध्ये २४ मीटर, १२ मीटर, १५ मीटर असे डीपी रोड प्रस्तावित केले आहेत.  

हजारो घरे होणार जमीनदोस्त 

तसेच ३० मीटर HCMRT चे आरक्षण टाकले आहेत. दरम्यान नागरिकांनी आपल्या पोटाला चिमटा मारून  कशीबशी आपल्या हक्काची घर मागील काही दशकापूर्वी बांधली आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेल्या डीपी रोड मुळे थेरगाव परिसरातील हजारो नागरिकांची घर जमीनदोस्त करावी लागणार आहेत. यामुळे अनेकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. या कारणाने रस्त्यांना विरोध केला जात आहे. 

रस्त्यांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यामुळे थेरगाव परिसरातील नागरिकांची घर जमीनदोस्त करावी लागणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव परिसरात टाकलेली रस्त्याची आरक्षण तातडीने रद्द करावी; अशी मागणी थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT