Nandura Police : गोदामावर छापा टाकत लाखोच्या गुटखा जप्त; नांदुरा पोलिसांची कारवाई, एकजण अटकेत

Buldhana News : बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून नांदुरा तालुक्यात अवैध गुटखा मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हानपूर येथून वाहतूक केला जातो
Nandura Police
Nandura PoliceSaam tv
Published On

नांदुरा (बुलढाणा) : छुप्या पद्धतीने गुटखा वाहतूक व विक्री होत असताना अनेकदा समोर आले आहे. त्यानुसार नांदुरा पोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याठिकाणाहून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. 

बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून नांदुरा तालुक्यात अवैध गुटखा हा मध्यप्रदेश राज्यातील बुऱ्हानपूर येथून जळगाव जामोद मार्गे वाहतूक केला जातो. परंतु आजपर्यंत नांदुरा तालुक्यातील गुटखा माफियांना लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही. तर नव्याने रुजू झालेले आणि अवैद्य व्यवसायावर धडक कारवाईचा सपाटा लावणारे पोलीस स्टेशन नांदुराचे नवनियुक्त ठाणेदार जयवंत सातव यांनी अवैध व्यवसायिकां विरुद्ध धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

Nandura Police
Dombivali : ठाकुर्लीत मनसे-ठाकरेंची सेना एकत्र, अर्धवट उड्डाणपुलावर केलं आंदोलन

याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांदुरा शहरातील पूर्णानगर या परिसरात एका टीन पत्र्याच्या गोडाऊनमध्ये गाडीसह गुटखा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यावरून नांदुरा पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकला असता या गोडाऊनमध्ये एक चार चाकी वाहन आणि गोडाऊनचे आतील एका टीन पत्र्याची खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आढळून आला. 

Nandura Police
Ashadhi Yatra : आषाढी वारीत गर्दीचे १३ ठिकाणी ब्लॅक स्पाॅट; गर्दी व्यवस्थापासाठी एआयचा वापर

२० लाखांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल 

दरम्यान गोडाऊनमध्ये एकूण १२ लाख रूपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तर गाडीची किंमत धरून एकूण २० लाखांचा मुद्देमाल घटनास्थळ वरून जप्त केला.  याप्रकरणी पोलिसांनी गोडाऊन जागा मालक विशाल जैन तसेच वाहन चालक- मालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटख्याच्या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com