Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : मुळा नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा परिणाम

Pimpri chinchwad News : शहरांजवळून गेलेल्या नदींमध्ये कंपन्यांचे पाणी सोडले जात असते. यामुळे अनेकदा नदीतील जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आले आहेत

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जात असते. याचा परिणाम नदीतील जीवांवर होत असून या रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले आहेत. नदी पात्रातील लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत.

शहरांजवळून गेलेल्या नदींमध्ये कंपन्यांचे पाणी सोडले जात असते. यामुळे अनेकदा नदीतील जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आले आहेत. दरम्यान (Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी पात्रावरील केजूबाई बंधाऱ्याजवळ यापूर्वी देखील लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील मुळा नदी पात्रात लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. 

महापालिकेचा निष्काळजीपणा 

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे पर्यावरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे काही खासगी कंपन्या मुळा नदीपात्रामध्ये रसायन मिश्रीत पाणी सोडत आहेत. त्यामुळे मुळा नदीपात्रातील जलचर जीवन धोक्यात आले आहे. एमपीसीबी बोर्डाच्या अध्यक्षांना मर्सिडीज कंपनीचे प्रदूषित पाणी दिसते. मात्र मुळा, पवना आणि (Indrayani River) इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी का दिसत नाही? असा सवाल पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

SCROLL FOR NEXT