Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray News : राज्यावर मोठा अन्याय होत असल्याने प्रत्येक निवडणूक महत्वाची; आदित्य ठाकरे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : राज्यात आमच्यासाठी फक्त मावळ लोकसभाच नाही, तर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत. कारण आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. (Loksabha Ekection) राज्यातील सर्व उद्योग धंदे राज्य बाहेर पाठवले जात आहेत. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीने आणि ताकदीने जिंकन गरजेचं असल्याचे मत युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात आज आदित्य ठाकरे दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मत व्यक्त केले आहे. आमच्या तोंडाचे घास देखील पळवलं जात आहे. उद्योग, कृषी क्षेत्र कोलमंडले आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक सीटवर जिंकून एंन खूप महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामंतांनी स्वतःच्या खात्याची ओळख करून घ्यावी 
ज्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याबद्दल किती जास्त माहित आहे. हे मला माहित नाही. कारण मागच्या वेळेस जेव्हा वेदांत फॉक्स कॉन आणि टाटा एअरबस इथून जेव्हा निघून गेले; हे त्यांना माहितीच नव्हतं. म्हणून मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही. ज्यांना माहित नाही त्यांच्यावर टीका करून काय अर्थ. आधी त्यांनी स्वतःच्या खात्याची ओळख करून घ्यायला हवी; अशी टीका आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्रात राजकीय स्थिरता नाही 
मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या राज्यासाठी इकॉनॉमिक कौन्सिल बनवलं. त्या कौन्सिलचे अध्यक्ष गुजरातमध्ये जाऊन १७ हजार कोटीची गुंतवणूक करत असतात. शेवटी राज्यात उद्योगधंदे तेव्हाच येतात, जेव्हा उद्योगधंद्यांना वाटतं की राज्यामध्ये राजकीय स्थिरता आहे. मात्र आपल्या राज्यात राजकीय स्थिरताच नाही. मागच्यावेळी दाओसमध्ये जे ८० हजार कोटी रुपयाचे करार झाले. त्यातले एकही करार अमलात आला नाही. कदाचित उद्योग धंदे चालकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल. जे नेते आपल्याच पक्षाचे चाळीस आमदार घेऊन पळाले. ते कदाचित आपल्याही मॅनेजरना देखील घेऊन पळून जातील असा त्यांना वाटत असेल, म्हणून ते आपल्या राज्यात गुंतवणूक करत नाहीत,असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT