Aditya Thackeray: 'भाजपने २ पक्ष फोडले, खोके सरकार डोक्यावर बसवलं..' पिंपरीच्या सभेत आदित्य ठाकरे बरसले

Aditya Thackeray News: शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. पिंपरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा महा निष्ठा महा न्याय मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSaamtv

Aditya Thackeray News:

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांचं पिंपरी चिंचवड शहरात शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढून जोरदार स्वागत केले. यावेळी पिंपरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा महा निष्ठा महा न्याय मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"फुले उधळून स्वागत करत असताना जेसिबीची भिती वाटते. जेसीबी अंगावर कोसळेल की काय असं वाटते. राजकारणात काटेदार खेकडे खूप असतात. मात्र हे जेसीबीचे खेकडे प्रेमाचे आहेत," अशी मिश्किल टिप्पणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला केली.

"आपण आज मोठ्या जिद्दीने, ताकदीने एकत्र आलो आहोत. गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाहीत, आपण कब्जा करुन बसलो नाही. आपल्या डोक्यात मस्ती, माज नाही. आपल्या ह्रदयात प्रेम आहे, आपल्याला एकत्र आणत आहे.." असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपने पक्ष फोडले..

"महाविकास आघाडीचं (Mahavikas Aaghadi) चांगलं चाललेल सरकार ह्यांनी गद्दारी करुन पाडलं आणि एक अवकाळी खोके सरकार डोक्यावर बसवलं. भाजपने दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला आणि खोके सरकार डोक्यावर बसवलं. एवढं सगळं करुन त्यांना खुर्च्या मिळाल्या, पण महाराष्ट्राला काही मिळालं का? नवा उद्योग राज्यात आला का?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray News
Shirpur News : अकरा लाखांचा गुटखा भरलेला ट्रक पकडला; शिरपूर पोलिसांची कारवाई

सर्व उद्योग गुजरातला पळवले..

"सर्व उद्योग आणि प्रकल्प आज गुजरातला पळाले आहेत. तळेगावात होणारा वेदांत पॉक्सकॉन गुजरातला गेला. हा प्रकल्प गुजरातच्या ढोलेरा गावात गेला त्या गावात साधी वीज सुद्धा नाही. त्या पाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेला, असे म्हणत आज आपला एक लाख रोजगार बुडाला आहे," अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

Aditya Thackeray News
Traffic Jam: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी; नागरिकांचा खोळंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com