श्रीराम आपलं आराध्य दैवत आहे. ज्यांच्या चरित्रातून आपण ऊर्जा घेतो. आपली तत्व, मूल्य त्यांच्यापासून सुरू होतात. भारतीय संस्कृती त्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाली. अशा श्रीरामांना खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम महर्षी वाल्मिकी यांनी केलं. त्यामुळे वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. उद्या श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापणा होणार असून या भव्य दिव्य सोहळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
श्रीराम आपल्यापर्यंत पोहोचणारे भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या आरतीचा कार्यक्रम हा महत्त्वपूर्ण आहे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण रामापर्यंत पोहोचू शकलो. अनुसूचित जाती मोर्च्याचे अभिनंदन करतो. महर्षी वाल्मिकीची आरती केली आणि महाप्रसादाचं आयोजन केलं, असे गौरोवोद्गार त्यांनी काढले. 22 जानेवारीनंतर आपल्याला राम राज्याची स्थापना करायची आहे. रामराज्य म्हणजे ज्या राज्यात समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज तेवढाच महत्त्वाचा आहे. जेवढा पहिल्या पंगतीत बसणाऱ्या व्यक्तीचा आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रामराज्य म्हणजे समतेचं राज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समतेचं राज्य दिलं. तीच राम राज्याची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राम राज्याची संकल्पना येत्या काळात आपल्या देशात होईल. आपला देश पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम देश म्हणून प्रस्थापित होईल त्याची सुरुवात 22 तारखेपासून होत असल्याचं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.