Hinjewadi IT Hub Private Travels fire four employees die  Saam Tv News
महाराष्ट्र

Hinjawadi Fire Accident : लोखंडावर नखांचे ओरखडे! लॉक दरवाजा उघडण्याचा अतोनात प्रयत्न; पुणे अपघाताची इनसाईड स्टोरी

Pimpri Chinchwad Hinjawadi Travels Fire : या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गाडीतील सर्व कर्मचारी हे व्योमा ग्राफिक्स कंपनीचे होते. या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Prashant Patil

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये काल एक भीषण घटना घडली. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या ट्रॅव्हलरमध्ये ड्रायव्हरसह एकूण १५ जण होते. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गाडीत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी खिडकीमधून बाहेर उडी घेतली. पण मागचा दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने या ४ जणांना गाडीतून बाहेर पडता आला नाही. गाडीच्या जळालेल्या लोखंडावर नखांचे ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाजाला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गाडीतील सर्व कर्मचारी हे व्योमा ग्राफिक्स कंपनीचे होते. या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिंजवडी आयटी हब येथे विविध कंपन्यांमध्ये ५ लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग करतात. मात्र, काल घडलेली घटना मन हेलावणारी होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाडीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मात्र, या गाडीचा मेंटेनन्स केला होता की नाही? हे पाहणे आता महत्वाचं ठरणार असून याची चौकशी सुरु आहे.

शॉर्ट सर्किट झाल्याने वाहनाला आग लागली. आग लागल्याचे समजातच चालकाने वाहनातून खाली उडी मारली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. त्यावेळी गाडीमध्ये पुढे बसलेले कर्मचारी तात्काळ गाडीतून खाली उतरले. मात्र, मागे बसलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने उतरने शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT