Pune News : पुण्यात मन हेलावणारी सकाळ, ४ जणांचा होरपळून मृत्यू; जीव घेणाऱ्या गाडीचा मेंटेनन्सच नाही?

Pimpri Chinchwad Travels Fire : हिंजवडी आयटी हब येथे विविध कंपन्यांमध्ये ५ लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग करतात.
Pimpri Chinchwad Travels Fire
Pimpri Chinchwad Travels Fire Saam Tv News
Published On

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आज एक भीषण घटना घडली. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या ट्रॅव्हलरमध्ये ड्रायव्हरसह एकूण १५ जण होते. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गाडीत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी खिडकीमधून बाहेर उडी घेतली. पण मागचा दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने या ४ जणांना गाडीतून बाहेर पडता आला नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गाडीतील सर्व कर्मचारी हे व्योमा ग्राफिक्स कंपनीचे होते. या गाडीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेबाबात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

हिंजवडी आयटी हब येथे विविध कंपन्यांमध्ये ५ लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग करतात. मात्र, आज घडलेली घटना मन हेलावणारी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाडीत शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. मात्र, या गाडीचा मेंटेनन्स केला होता की नाही? हे पाहणे आता महत्वाचं ठरणार असून याची चौकशी सुरु आहे.

Pimpri Chinchwad Travels Fire
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणाला धक्कादायक वळण, सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांचा आरोप

शॉर्ट सर्किट झाल्याने वाहनाला आग लागली. आग लागल्याचे समाजातच चालकाने वाहनातून खाली उडी मारली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. त्यावेळी गाडीमध्ये पुढे बसलेले कर्मचारी तात्काळ गाडीतून खाली उतरले. मात्र, मागे बसलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने उतरने शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबतचा तपास करण्याचं काम सुरु आहे. तसेच यासाठी आरटीओचे अधिकारी देखील बोलवण्यात आले आहेत. वाहनाची कसून तपासणी करण्याचं काम सुरु आहे. तसेच या गाडीला अचानक आग कशी लागली? याबाबत फॉरेन्सिक टीमकडून तपास केला जात आहे.

Pimpri Chinchwad Travels Fire
Nagpur News: 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून काढू', नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com