Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case Saam
महाराष्ट्र

Phaltan Doctor Case: PSI बदनेसोबत ६ महिने संपर्क, आत्महत्येपूर्वी बनकरला फोटो अन् मेसेज पाठवले; रुपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा

Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टर आणि PSI बदने ६ महिने संपर्कात होते अशी माहिती त्यांनी दिली.

Priya More

साताऱ्याच्या फलटणमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आरोपी आणि आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांच्यातील संपर्काविषयी सांगितले.

'जानेवारी ते मार्चदरम्यान डॉक्टर आणि पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हे संपर्कात होते आणि त्यांचे अनेकदा बोलणं झालं होतं. त्यानंतर डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या संपर्कात होती, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. तसंच, पोलिसांनी सीडीआर काढला आहे. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने, प्रशांत बनकर यांची नावं होती. जानेवारी ते मार्चदरम्यान गोपाल बदनेसोबत डॉक्टर संपर्कात होती. त्यानंतर डॉक्टर आणि बदनेचा काही संवाद झाला नाही. त्यानंतर प्रशांत बनकरसोबत डॉक्टराचा संवाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.'

रुपाली चाकणकर यांनी पुढे सांगितले की, 'डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की चार वेळा बलात्कार केला. त्यानुसार गोपाल बदने आणि डॉक्टर या दोघांचे लोकेशन कुठे एकत्र होतं का? हे सीडीआरच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीडीआर आणि फॉरेन्सिकच्या अहवालातून लोकेशन शोधलं जाणार आहे. पोलिसांकडून गोपाल बदनेचा जबाब नोंदवला जात आहे. पोलिसांकडून डॉक्टर, बदने आणि बनकर या तिघांचाही सीडीआर काढला जात आहे. तर इतरांचा सीडीआर गरजेचा पडला तर तो काढला जाईल.'

दरम्यान, 'या प्रकरणाचे सर्व अपडेट महिला आयोगाकडून रोज घेतले जात आहेत. आम्ही याबाबत आवश्यक सूचना देत आहोत. सीडीआर, फॉरेन्सिक अहवाल अशीच कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास एसपी, डीव्हायएसपी, सायबर सर्व एकत्रितपणे करत आहेत. ', असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : छट पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

Phaltan Doctor Case:सातारा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागले डॉक्टर आणि आरोपीमधील चॅटिंग अन् सीसीटीव्ही फुटेज

नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर... उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना घणाघाती इशारा|VIDEO

Kareena Kapoor: करीना कपूरचा बोल्ड हॉलिडे लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: संपूर्ण कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा वर्धा जिल्ह्यात दाखल

SCROLL FOR NEXT