Phaltan Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Phaltan Assembly: लोकसभेला बंडखोरी, विधानसभा राजेंना जड जाणार; फलटणमध्ये महायुतीतचं सामना? असं असेल राजकीय गणित, वाचा...

Phaltan Assembly Election 2024: महायुतीत असूनही राजे गटाने रणजित निंबाळकर यांच्याविरोधात उघड- उघड बंडाचा झेंडा फडकावला होता, ज्याचा फटका महायुतीला बसला अन् रणजितसिंह निंबाळकर पराभूत झाले. त्यामुळे आता विधानसभेला भाजपकडून दीपक चव्हाण यांना विरोध होणार हे स्पष्ट आहे.

Gangappa Pujari

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो माढा मतदार संघ. माढा मतदारसंघात तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात महायुतीमधूनच शड्डू ठोकण्यात आला होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकरांना विरोध केला होता. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीतही त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम केले होते. आता लोकसभेतील या बंडखोरीमुळे फलटण विधानसभेत महायुतीमध्येच सामना रंगण्याची शक्यता आहे. कसं असेल फलटण विधानसभेचे गणित, जाणून घ्या सविस्तर....

फलटण विधानसभा २०२४

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील फलटण विधानसभा हा महत्वाचा मतदार संघ आहे. फलटण हे एक पुरातन शहर असून महानुभावपंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटणची ओळख आहे. त्याचबरोबर स्वराज्यामध्ये उल्लेख असलेले निंबाळकर घराण्याचे वंशज रामराजे नाईक निंबाळकरही फलटणचेच. त्यामुळे या मतदार संघातील राजकारण बऱ्यापैकी राजेंभोवती फिरते.फलटण विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत.

मागील निवडणुकीत काय झालं?

दीपक चव्हाण यांनी सलग तीनवेळा हा ठिकाणी आमदार होण्याचा मान मिळवला आहे. याअगोदर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक चव्हाण यांच्यासमोर शिवसेनचे माजी आमदार बाबुराव माने,अपक्ष माजी आमदार लक्ष्मण माने हे उभे होते, त्यांनी शिवसेनचे माजी आमदार बाबुराव माने यांचा ३९,९१४ मतांनी पराभव करत ही निवडणूक जिंकली. तर २०१४ मध्ये दीपक चव्हाण यांच्यासमोर काँग्रेसचे दिगंबर आगवणे शिवसेनेकडून डॉ .नंदकुमार तासगावकर यांचे आव्हान होते. ही निवडणूकही पवार यांनी जिंकली होती. तर २०२९ मध्येही त्यांनी सर्वांना धक्का देत आमदारकीची हॅट्रिक मारली होती.

लोकसभेतील बंडखोरीमुळे विधानसभेला फटका?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर फलटण विधानसभेचे चित्र बदलून गेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. महायुतीत असूनही राजे गटाने रणजित निंबाळकर यांच्याविरोधात उघड- उघड बंडाचा झेंडा फडकावला होता, ज्याचा फटका महायुतीला बसला अन् रणजितसिंह निंबाळकर पराभूत झाले. त्यामुळे आता विधानसभेला भाजपकडून दीपक चव्हाण यांना विरोध होणार हे स्पष्ट आहे.

तसेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटही दीपक चव्हाण यांच्याविरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत विद्द्यमान आमदारांचा कस लागणार आहे. त्यामुळे फलटण विधानसभा मतदार संघात हायहोल्टेज लढत होण्याची शक्यता आहे. शेवटी या जागेसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीकडून कोणता डाव टाकला जातो? हे अंतिम टप्प्यात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT