Parshuram Ghat, Breaking News, Ratnagiri, Rain SAAM TV
महाराष्ट्र

Parshuram Ghat : आजपासून पुढील आठ दिवस परशुराम घाट वाहतुकीस बंद

राज्यातील विविध जिल्ह्यांत गेले दाेन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) परशुराम घाट (parshuram ghat) वाहतूकीसाठी आजपासून (मंगळवार) पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले जात हाेते. या घाटात पावसामुळे दरड आणि माती ढासळत असल्याने सुरक्षितीतेसाठी प्रशासनाने वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. (parshuram ghat latest marathi news)

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या घाटात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड देखील कोसळत आहे. त्यामुळे घाट गेल्या 20 तासांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

या धोकादायक बनलेल्या घाटाची पाहणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे (sindhudurg) खासदार विनायक राऊत यांनी आज केली. परशुराम देवस्थान आणि त्याच्या आजूबाजूला असलेले घर यांना धोका निर्माण झाला आहे. ठेकेदारांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याची पूर्तता झालेली नाही.

येणारा पाण्याचा प्रवाह मेंटेन करा, घराला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर तिथल्या घरातील लोकांना देखील काळजी घेण्याच्या सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर छोट्या गाड्या आहे त्या सुरु ठेवायच्या की नाही याबाबत सध्या विचार सुरु आहे असेही खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

MNS-Shivsena: ठाकरेंचे मुंबईत किती नगरसेवक?, शिवसेना-मनसेच्या विजयी शिलेदारांची यादी वाचा एका क्लिकवर

Raj Thackeray reaction : काय चुकलं? पराभवानंतर राज ठाकरे निराश, व्यक्त केले दु:ख; म्हणाले, दोन्ही...

Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

Nail Care At Home : नखं वाढवल्यावर तुटतात? मग नखं मजबूत करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT