नेदरलँड : भारतीय महिला हॉकी (hockey) संघाने FIH हॉकी विश्वकरंडक (FIH Womens Hockey World Cup) स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 1-1 अशा गुणांची बरोबरी साधली. इसाबेला पेटरने (Isabella Petter) नवव्या मिनिटाला इंग्लंडला (England) आघाडी मिळवून दिली पण भारताच्या (india) वंदना कटारियाने (Vandana Katariya) 28व्या मिनिटाला गाेल नाेंदविल्याने दाेन्ही संघांचा गुणफलक बरोबरीत राहिला. (fih womens hockey world cup latest marathi news)
भारताने प्रत्युत्तर देत सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले पण पहिल्याच प्रयत्नात गुरजीत कौरचा शॉट गोलपोस्टला लागला तर तिचा दुसरा प्रयत्न इंग्लंडचा गोलरक्षक हिंचने हाणून पाडला. 17व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण यावेळीही गुरजीत गोल करण्यात अपयशी ठरली. तीन मिनिटांनंतर सविताने पुन्हा इंग्लंडला गाेल करण्यापासून राेखले.
28व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी वंदनाने रिबाऊंडवर गोल करत गुणफलक 1-1 असा बराेबरीत ठेवला. मध्यंतरापूर्वी भारतीय संघास आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण हिंचने पुन्हा ताे अप्रितमरित्या रोखला. खेळाच्या तिसऱ्या सत्रात इंग्लंडने वेगवान सुरुवात केली पण त्यांना फारसे यश आले नाही. भारतीय संघातील नेहा गोयलने मारलेला एक फटका गोल हिंचने अडविला अन्यथा भारताचा गुण फलक दाेनवर पाेहचला असता.
चौथ्या सत्रात दोन्ही संघ चुरशीने खेळले मात्र एकाही संघास गोल नाेंदविता आला. सामन्याच्या ५६व्या मिनिटाला भारतीय संघास आघाडी घेण्याची संधी मिळाली पण शर्मिला देवी (Sharmila Devi) जवळून गोल करू शकली नाही आणि चेंडू तिच्या पायाला लागला.
दोन मिनिटांनंतर भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यातही यश मिळाले नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या कास्यपदकाच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघास या सामन्यात बदला घेण्याची संधी होती, पण ती हुकली. 'ब' गटात मंगळवारी भारतीय संघाच सामना चीनशी होईल.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.