Liquor Ban Saam tv
महाराष्ट्र

Liquor Ban : ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव; तरीही गावात खुलेआम दारू विक्री, महिला आक्रमक

Parbhani News : ग्रामसभेत गावामध्ये सुरु असलेली दारू बंदी करण्यासाठी ठराव करण्यात आला. अर्थात गावात दारू विक्री नाकारण्यात आली होती दारूबंदीचा ठराव झाल्यानंतर देखील पुन्हा गावात दारू विक्री

Rajesh Sonwane

विकास शिंदे 
परभणी
: गावात सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने महिला, ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या विरोधात आवाज उठविण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला होता. मात्र यानंतर देखील गावात खुलेआम दारू विक्री केली जात असल्याने समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. 

परभणी जिल्ह्यातील लिमला या गावातील हा प्रकार आहे. दरम्यान गावात दारू विक्री केली जात असल्याने विद्यार्थिनी, महिलासह दारूबंदीसाठी एल्गार करण्यात आला ओटा. गावातील दारू विक्री ही बंद व्हावी; यासाठी गावातील महिलांनी ग्रामसभेसमोर एल्गार पुकारण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत गावामध्ये सुरु असलेली दारू बंदी करण्यासाठी ठराव करण्यात आला. अर्थात गावात दारू विक्री नाकारण्यात आली होती. 

महिला आक्रमक 

दारूबंदीचा ठराव झाल्यानंतर देखील पुन्हा गावात दारू विक्री करण्यात येत आहे. यानंतर पुन्हा एकदा महिलांनी एल्गार पुकारला आहे. ग्रामसभेमध्ये महिलांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाटली आडवी का उभी? हे मतदानातून दाखवून देऊ असा ठाम विश्वास महिलांनी ठेवला. याबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. ताडकळस पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे दारू विक्रेत्यांचे फावत असून, यामुळे महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. 

पोलिसांविरोधात घोषणाबाजी 

तर सांगूनही दारू विक्री चालूच असल्याने संतप्त महिलांनी गावच्या मंदिरामध्ये येऊन मंदिराच्या चावडी जवळ येऊन ताडकळस पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आज गावातून बोलत आहोत उद्या तुमच्या दालनात येऊन बसू असा इशारा यावेळी महिलांनी दिला. यावेळी गावकरी महिलांसह पुरुष उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्षुल्लक कारणावरून २ टोळ्यांमध्ये वाद; हाणामारी अन् हवेत गोळीबार, पुण्यात नक्की चाललंय तरी काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची 6 तारखेला भेट होणार

Mumbai Local : ऑटोमॅटिक दरवाजा असणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार, पहिला व्हिडिओ समोर

VIP Number: गाडीसाठी खास व्हीआयपी नंबर कसा मिळवावा? सोपी पद्धत आणि फी

Monsoon Update : उकाड्याला ब्रेक लागणार, आजपासून राज्यात पाऊस धो धो कोसळणार, वाचा हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात सांगितला पाऊस

SCROLL FOR NEXT