Dharashiv : बारा किलोमीटर पाठलाग करून चोरट्यांनी मारला डल्ला; कारची काच फोडून लांबवीले १ लाख ३० हजार रुपये

Dharashiv News : क्षत्रगुण रामा गरड या दूध व्यावसायिकाने शेतकऱ्यांचा पगार करण्यासाठी बँकेतून रक्कम काढली होती. हीच रक्कम चोरट्याने पळविल्याचे घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दूध व्यावसायिक असलेल्या शेतकऱ्याने बँकेतून रक्कम काढून गाडीत ठेवली. यावर चोरट्यांची नजर होती. दरम्यान गाडी घेऊन निघालेल्या या शेतकऱ्याच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. बारा किलोमीटर पर्यंत पाठलाग करत गाडीची काच फोडून १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना परंडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

धाराशिवच्या परंडा तालुक्यातील दूध व्यवसायिकाच्या चार चाकी गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपये घेऊन चोरट्यानी पळ काढला आहे. तब्बल बारा किलोमीटरचा पाठलाग करत गाडीवर लक्ष ठेवून चिंचपुर येथील क्षत्रगुण रामा गरड या दूध व्यावसायिकाने शेतकऱ्यांचा पगार करण्यासाठी बँकेतून रक्कम काढली होती. हीच रक्कम चोरट्याने पळविल्याचे घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Dharashiv News
Crime News : सांगली हादरले! पाठलाग करत भररस्त्यात केली हत्या; मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार

पोलिसात गुन्हा दाखल 

परंडा तालुक्यात दिवसा ढवळ्या दूध व्यवसायिकाच्या पैशावर चोरट्याने मारलेल्या डल्ल्यामुळे परंडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. दरम्यान या प्रकरणी शेतकरी क्षत्रगुण गरड यांनी अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस तपास करत आहेत.

Dharashiv News
Kalyan : शालिमार एक्सप्रेसमधून गांजा तस्करी; साडेआठ किलो गांजासह एकजण ताब्यात

वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर मधील जय शिवश्रद्धा इमारतीत शनिवारी रात्री हेल्मेट घालून आलेल्या दरोडेखोराने वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा टाकला. आरोपीने घरात शिरताच वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन वेळा प्रहार केला. तर मदतीस आलेल्या शेजारील महिलेच्या डोक्यात बाटली फोडून दोघांनाही गंभीर जखमी केले. त्यानंतर घरातील दागिने लुटून आरोपी पसार झाला. जखमी वृद्ध गणेश गायकवाड यास उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com