parbhani news acb arrests krishi paryavekshak of gangakhed in bribe case saam tv
महाराष्ट्र

Parbhani : गंगाखेडचे कृषी पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात, 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Parbhani Bribe News : गंगाखेड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली.

राजेश काटकर

Parbhani :

गंगाखेड अनुदानावर मंजुर झालेल्या रोटावेटर आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी तीन हजारांची लाच स्विकारताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगाखेड येथील कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (anti corruption bureau parbhani) मंगळवारी (ता.12 मार्च) कारवाई केली. मोहन सुरेशराव देशमुख असे लाचखोर कृषी पर्यवेक्षकाचे नाव असल्याची माहिती एसीबी कार्यालयातून मिळाली. (Maharashtra News)

तक्रारदार यांच्या पुतण्याची रोटावेटरसाठी ऑनलाईन सोडतमध्ये निवड झाली. त्यांना पूर्व संमतीपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले. रोटावेटरची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी मोहन देशमुख यांनी 21 फेब्रुवारीला भेट देवून फोटो काढले.

यावेळी त्यांनी मी तुमचे मोठे काम केले आहे. यापुर्वी देखील फोटो अपलोड केले तेंव्हा तुम्ही मला येऊन भेटतो असे म्हणाले होताे परंतु भेटला नाही असे म्हणत अनुदान रक्कम बँक खात्यावर टाकण्यासाठी देशमुख यांनी तक्रारदारास लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने या बाबत परभणी लाचलूचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानूसार मंगळवारी (ता. 12 मार्च) एसीबीने देशमुख यांच्यावर सापळा लावला.

यावेळी मोहन देशमुख यांनी पंचासमक्ष तीन हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यांना ताब्यात घेण्यात आले. गंगाखेड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर, सदानंद वाघमारे, निलपत्रेवार, नागरगोजे, जिब्राईल शेख, बेद्रे, कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT