Maharashtra Election  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : बाब्बो! 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'मधला तो सीन महाराष्ट्राच्या राजकारणातही; निवडणूक अधिकाऱ्यांना घाम फुटला!

Maharashtra Election update : मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मकरंद अनासपुरे यांची स्टाईल वापरली. त्यांच्या स्टाईलमुळे निवडणूक अधिकाऱ्यांना घाम फुटला.

राजेश काटकर

परभणी : राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागले आहेत. राज्यभरातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवार अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. परभणीतही निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, एक मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढवली. बाळासाहेब काजळे यांनी अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना चक्क चिल्लर दिली. बाळासाहेब काजळे यांच्या कृत्याने अनेकांना 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' सिनेमातील सीनच आठवला.

मनोज जरांगे समर्थक बाळासाहेब काजळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी येत्या विधानसभेत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले होते. त्यानुसार, जिंतूर सेलू विधानसभा उमेदवारी दाखल करताना अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क मराठा समाजातील नागरिकांनी एक,दोन, पाच रुपयांची नाणी जमा करून दिली. ही नाणी मोजताना प्रशानाची डोकेदुखी वाढली होती.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मागील दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मात्र राज्यसरकारने मराठा आरक्षण दिले नसल्यामुळे येत्या विधानसभेत उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. यासाठी आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितले होते. यासाठी जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय काम करणारे बाळासाहेब काजळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

बाळासाहेब काजळे यांच्यासाठी समाजातील नागरिकांनी एक,दोन,पाच रुपयांची नाणी जमा केली होती. ही नाणी अनामत रक्कम म्हणून संबंधित उमेदवार काजळे यांनी जमा केली. यावेळी नाणी मोजण्यासाठी वेळ लागला असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. यावेळी केवळ एक हजार रुपयांची नाणी प्रशासनाने स्वीकारली. दरम्यान, यावेळी कार्यालयातील अनेकांना मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार आमच्यावर अन्याय करतंय, जरांगे उपोषण करण्यावर ठाम

konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Deepali Sayyad : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन; नेमकं काय प्रकरण?

'Deool Band 2' Movie Box Office Collection 7 Days: 'देऊळ बंद 2' चित्रपटाची गाडी सुसाट, पहिल्याच आठवड्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रूपये

SCROLL FOR NEXT