Shruti Vilas Kadam
मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याचा वेग कमी होतो.
मेथीतील फायबरमुळे आतड्यांचे कार्य सुरळीत राहते. मेथी दाण्यामुळे अॅसिडिटी, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता सारखे त्रास कमी होण्यास मदत होते.
मेथीमधील फायबरमुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामही आवश्यक आहेत.
काही अभ्यासांनुसार मेथीचे सेवन रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे शरिरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.
रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मेथी मदत करू शकते. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे तसेच फायबर असते. संतुलित आहारात मेथी खल्ल्याने केल्यास शरीराला काही आवश्यक पोषक घटक मिळतात.
मेथीचा वापर स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दूध वाढवण्याचे काम करते. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांना मेथाीचे लाडू दिले जातात.
(टिप : अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या साम टिव्ही याचे १००% समर्थन करत नाही)