Shruti Vilas Kadam
सूर्यनमस्कार करताना हात, पाय, कंबर, पाठ आणि खांद्यांच्या स्नायूंना ताण मिळतो. नियमित सरावामुळे शरीराची लवचिकता सुधारते.
सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामध्ये एनर्जी जास्त लागते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत सूर्यनमस्कार केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार करताना हात, पाय, पोट आणि पाठीचा चांगला व्यायाम होते. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि शरीराचा समतोल सुधारण्यास मदत मिळते.
सूर्यनमस्काराचा नियमित सराव केल्याने शारीरिक सक्रिय होते. हळूहळू सरावाचा वेग आणि वाढवल्यास शरीराची सहनशक्ती वाढते.
सूर्यनमस्कार करताना हालचाली आणि श्वास नियंत्रण ठेवले जाते. यामुळे मन एकाग्र होण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
पहिल्यांदाच सुरुवात करताना २ ते ४ वेळा करावं. शरीराला सवय झाल्यानंतर क्षमतेनुसार सेट वाढवावे. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी हलका वॉर्म-अप करा.